पशुधनावर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा - किशोर जाधव

पशुधनावर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा - किशोर जाधव

ठाणे (प्रतिनिधी) : 
गेल्या काही दिवसांपासून जिल्हयात मुसळधार पाऊस बरसत आहे. या पावसाचा परिणाम विविध साधन संपत्तीवर होत असताना पशुधनावर देखील होत आहे. त्यामुळे  संबंधित कार्यक्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांनी पशुधनाचे पंचनामे, मृत्यू दाखले, लसीकरण, तसेच वेळेत औषध उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी अशासूचना जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती किशोर जाधव यांनी दिल्या.

कल्याण तालुक्याचा मंगळवारी दौरा करीत सभापती जाधव यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी तालुक्यातील चिंचवली येथे जाऊन मृत्यू झालेल्या म्हशी, रायता येथे पुरात वाहून गेले गायी म्हशी, तसेच पांजरापोळ येथील गायी, बकऱ्या , मेंढ्या इतर पाळीव प्राणी यांची पहाणी केली. तसेच संबंधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.विजय धुमाळ, सहा आयुक्त डॉ.विनोद राईकवर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.लक्ष्मण पवार उपस्थितीत होते..