कल्याण पूर्वेत आमदारांच्या प्रयत्नाने नागरी विकास कामांचा शुभारंभ

कल्याण पूर्वेत आमदारांच्या प्रयत्नाने नागरी विकास कामांचा शुभारंभ

कल्याण (सुरळकर आर. टी.) : 
कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने व राज्य शासनाच्या विशेष विकास निधीतून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला.

कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या महापालिका प्रभागांमध्ये विविध ठिकाणी नागरी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आजी-माजी नगरसेवक, महापालिकेचे अधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. गायकवाड यांनी या कामांसाठी शासनाच्या विशेष विकास निधीतून निधी उपलब्ध करून दिला आहे.

शुभारंभ करण्यात आलेल्या कामांमध्ये गणेशवाडी प्रभागातील विशाल जुन्नर पतपेढी ते यादगार मटनशॉप पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण, तिसगाव गावठाण येथील मंगल मूर्ती परिसरातील गटार व पायवाटा, शनिमंदिर प्रभागातील सद्गुरू अपार्टमेंट ते श्री विठ्ठल पावशे यांचे घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, हनुमान नगर प्रभागातील गावदेवीनगर येथील बगिचाचे सुशोभीकरण व लहान मुलांच्या खेळाच्या वस्तू बसविणे, कैलासनगर प्रभागातील साईबाबा नगरमधील मयुर सोसायटी चाळ परिसरातील गटार-पायवाटा बनवणे, आशेळे गाव कृष्णनगर प्रभागातील पाण्याची टाकी ते सिद्धीविनायक चाळीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे, माणेरे-वसार प्रभागातील पार्वती लक्ष्मी निवास ते अनंता भोईर यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, तसेच माणेरे गावठाण मधील नेहाली फ्लॉवर मिल ते जिल्हा परिषद शाळा पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, प्रभाग ११९ मधील श्रीमलंग मुख्य रस्ता ते द्वारली पाडा रस्ता काँक्रीटीकरण करणे, ओम शांती अपार्टमेंट परिसरात गटार पायवाटा व सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे, याच प्रभागातील श्री कृपा होम्स परिसरात गटार पायवाटा व सिमेंट काँक्रीट रस्ता बनविणे अशी सुमारे २ कोटी २० लाखांची ही कामे करण्यात येत आहेत.