कडोंमपा: महिला व मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ 

कडोंमपा: महिला व मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ 

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित अल्प उत्पन्न गटातील महिला व मुलींना फॅशन डिझायनिंग आणि चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याच्या योजनेचा शुभारंभ बुधवारी महापौर विनिता राणे यांचे हस्ते करण्यात आला. 

याप्रसंगी ‘ब’ प्रभाग समिती सभापती नीलिमा पाटील, नगरसेविका सुनंदा मुकुंद कोट, दमयंती वझे, तृप्ती भोईर, महिला व बालकल्याण समितीचे उपायुक्त मिलिंद धाट आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना महापौर यांनी प्रशिक्षणार्थी महिला व मुलींना स्वावलंबी व सक्षम होऊन रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील व्हावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रेखा राजन चौधरी यांनी उपस्थितांना उद्देशून, या वर्षापासून महिला व बालकल्याण समितीने चारचाकी वाहन, इंटिरियर डिझायनिंग, व्हिडीओग्राफी व फोटोग्राफी असे नाविन्यपूर्ण उपक्रम महिला व मुलींसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा लाभ महिला व मुलींनी घ्यावा, असे आवाहन केले. या योजने अंतर्गत महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने २०० महिला व मुलींना फॅशन डिझायनिंग तर ७३ महिला व मुलींना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील महिला व मुलींनी व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आल्याचेही चौधरी यांनी सांगितले.