कल्याण डोंबिवलीत पुन्‍हा लॉकडाउन वाढविणे गरजेचे - आ. राजू पाटील

कल्याण डोंबिवलीत पुन्‍हा लॉकडाउन वाढविणे गरजेचे - आ. राजू पाटील

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेञातील कोव्हिड रूग्‍णांची वाढती संख्‍या पाहता स्‍थानिक पातळीवर पुन्‍हा लॉकडाउन वाढविणे गरजेचे असल्याचे मत आमदार राजू पाटील यांनी शनिवारी महापालिका प्रशासना समवेत झालेल्या बैठकीत व्यक्त केले. महापालिका क्षेञातील वाढत्‍या रूग्‍ण संख्‍येवर प्रतिबंध घालण्‍याच्‍या दृष्टिने सर्वमताने चर्चा करण्‍यासाठी आचार्य अञे नाटयगृहातील कॉन्‍फरन्‍स हॅालमध्‍ये महापालिका प्रशासनाने बैठक आयोजित केली होती.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेञातील कोविड-19 च्या रुग्णांची वाढती संख्‍या पाहता महानगरपालिकेने आयसीयु बेड व ऑक्‍सीजन बेडची व्यवस्था करण्यावर लक्ष केंद्रित करावे, व्‍हेटिंलेटर्स विकत घ्‍यावेत. आवश्‍यकता लागल्‍यास अधिक निधी उपलब्‍ध करून देण्याचे आश्‍वासन पालकमंञी एकनाथ शिंदे यांनी अ बैठकीत दिले. महापालिकेने सध्याच्‍या परिस्थितीत बेडची संख्‍या वाढविणे तसेच कॉन्‍टॅक ट्रेसिंगही वाढविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगतले. 

सदर बैठकीत महापालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रथम महापालिका क्षेत्रातील कोव्हिडची सद्यथिती व त्‍यासाठी महापालिका करीत असलेली उपाययोजनांची माहिती प्रोजेक्‍टरवर सादर केली. यावेळी महापालिकेने कोव्हिडसाठी काम करणा-या जबाबदार अधिका-यांची नावे कळवावीत व म्‍हणजे तातडीचे प्रसंगी संपर्क करणे सुलभ होईल अशी सुचना आमदार रविंद्र चव्‍हाण यांनी केली. तसेच महापालिकेच्‍या शाळेत ऑनलाईन वर्ग चालू करावेत. या शाळांतील हुशार-स्कॉलरशिपप्राप्‍त मुलांना आपण स्‍वखर्चाने टॅब पुरवू असे आश्वासन कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी दिले. 

सदर बैठकीस महापौर विनिता राणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्‍वनाथ भोईर, आमदार जगन्‍नाथ शिंदे तसेच अप्पर पोलीस आयुक्त दत्‍ताञय कराळे, पालिका  स्थायी समिती सभापती विकास म्‍हाञे, सभागृह नेते प्रकाश पेणकर, विरोधी पक्ष नेते राहुल दामले, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्‍ली, उपायुक्‍त विजय पगार, पल्‍लवी भागवत,  रामदास कोकरे,  उमाकांत गायकवाड, वैदयकिय आरोग्‍य अधिकारी सुरेश कदम, डॉ. पानपाटील, डॉ. सरवणकर, पालिका सचिव संजय जाधव उपस्थित होते.