लॉकडाऊनमुळे दोन सुरेल आवाज सोशल मिडीयावर झाले व्यक्त

लॉकडाऊनमुळे दोन सुरेल आवाज सोशल मिडीयावर झाले व्यक्त

कल्याण (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरसमुळे कोविड१९ आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून काहीच काम नसल्याने घरात बसून लोक कंटाळले आहेत. मात्र काही हरहुन्नरी व्यक्तींनी लॉक झालेले असतानाही आपल्या कलागुणांना वाव देण्याचा फंडा अवलंबला आहे. कल्याण येथील व्यवसायाने कंत्राटदार असलेल्या विजय भोसले आणि संदीप जाधव यांनी आपल्या सुरेल आवाजाला सोशल मिडियावर गाण्यांच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

कल्याण पूर्व येथे राहणारे विजय भोसले हे व्यवसायाने बांधकाम ठेकेदार आहेत. एका रुक्ष व्यवसायात असूनही त्यांनी आपली गायनाची आवड आजही जपली आहे. हीच आवड त्यांनी लॉक डाऊनच्या काळात फेसबुकवर लाईव्ह येत ‘चांदी की दिवार ना तोडी ...’ (https://m.facebook.com/story.php?story_fbid=1112374892437059&id=100009936768312) हे गाणे सादर केले. त्यांच्या मित्रपरिवारामध्ये ते फारच प्रिय ठरले. अनेक मित्रांनी त्यांवर कमेंट व्यक्त करीत त्यांचे कौतुक केले. त्यानंतर काही दिवसातच भोसले यांनी ‘जीवन गाणे गात चलावे...’ (https://m.facebook.com/story.php?story_fbid=1116836098657605&id=100009936768312) हे मराठी गाणे देखील फेसबुकवर लाईव्ह सादर केले त्यालाही त्यांच्या मित्रांनी लाईक केले.

भोसले यांच्यासारखेच बांधकाम ठेकेदार असलेल्या कल्याण पश्चिमेतील बाबा उर्फ संदीप जाधव यांनीही फेसबुकवर ‘यारा तेरी यारी को...’ (https://m.facebook.com/story.php?story_fbid=2494708727508191&id=100009072651834) हे गाणे लाईव्ह सादर केले. त्यांनाही मित्रपरिवाराने चांगल्या कमेंट व्यक्त करीत त्यांनाही उत्स्फूर्त दाद दिली. जाधव  आणि भोसले यांचा लॉकडाऊनच्या वेळेचा चांगला उपयोग करण्याचा फंडा इतरांनाही प्रेरणा देईल यात शंका नाही.