खानदेश भूषण जितेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न

खानदेश भूषण जितेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न

कल्याण (सुरळकर आर.टी.) :
रेड स्वस्तिक सोसायटीचे पदाधिकारी तथा खानदेश भूषण जितेंद्र केवलसिंग पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त मलंगगड रस्त्यावरील पिसवली येथे नुकतेच मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक नवीन गवळी, स्थायी समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक रमेश म्हात्रे, जाट समाज महाराष्ट्रचे अध्यक्ष लक्ष्मण जाट, एरंडोलचे माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, मानव अधिकार कल्याणचे अध्यक्ष राजाभाऊ उजगरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

शेकडो गरजू नागरिकांनी या शिबिरात हजेरी लावली. तज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांची तपासणी करून त्यांना योग्य सल्ला तसेच औषधे देण्यात आली. अल्पदरात चष्मा वाटप, मोफत एमआरआय, अन्जोग्रफि, शुगर चेकअप, बीपी चेकअप, डेंटल चेकअप, आय चेकअप आदी तपासण्या देखील करण्यात आल्या. यावेळी ह्रुदय विकार, केन्सर, बायपास, अन्ननलिका, नेत्ररोग, कर्करोग, मणक्याच्या त्रास, अस्थिव्यंगोपचार, आतडयाचे  विकार, मुत्रविकार, गर्भपिशवी दुरुस्ती, मोतीबिंदू, अस्थमा असे आजार असलेल्या रुग्णांची देखील मोफत तपासणी करण्यात येऊन तातडीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी एकूण २० रुग्णांना तेरणा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि धर्मादाय अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांत मोफत वा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तसेच अशा रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी वाहन व्यवस्था देखील करण्यात आली होती.

सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री स्माईल डेंटल क्लिनिक (डोंबिवली), सोहम फौंडेशन, (उल्हासनगर), पाऊल फौंडेशन (मुंबई), सचिदानन्द ब्लड बँक (डोंबिवली), तेरणा हॉस्पिटल (मुंबई) व आनंद विश्व गुरुकुल (ठाणे) या रुग्णालयांनी विशेष सहकार्य केले. तसेच डॉ. लोखंडे, संजय तरे, डॉ. रुपाली रूके, रवी कदम, पूनम रूके, तन्वी हुलावले, जगदीश पाटील, मुक्ता जाधव, भैया चौधरी, बबलू पाटील, सज्जन गायकर, पप्पू चौधरी, उमा डोळस, सुनील पाटील यांनीही सहकार्य केले.