महानगर सफाई कर्मचारी संघाचे कल्याण-डोंबिवलीतील पदाधिकारी घोषित

महानगर सफाई कर्मचारी संघाचे कल्याण-डोंबिवलीतील पदाधिकारी घोषित

कल्याण (प्रतिनिधी) : महानगर सफाई कर्मचारी संघाच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांची घोषणा गुरुवारी स्वामी नारायण हॉल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी युनियनच्या फलकाचे उद्घाटन कामगार नेते अरविंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आम आदमी पक्षाचे कल्याण डोंबिवली महानगर अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड, कामगार नेते कोणार्क देसाई, महाराष्ट्र राज्य महानगर सफाई कर्मचारी संघाचे अध्यक्ष भारत गायकवाड, सरचिटणीस अब्बास घडीयाली आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महानगर सफाई कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. जाहीर केलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका युनिटची कार्यकारणीमध्ये अध्यक्ष- नारायण घेगंट, महिला विभाग अध्यक्षा- अश्विनी तांबे, उपाध्यक्ष- दत्ता पाटील, उपाध्यक्ष- हरीचंद्र म्हाञे, उपाध्यक्ष- दिपक तायडे, उपाध्यक्ष- सिध्देश कुडूसकर, उपाध्यक्षा- लक्ष्मी चव्हाण, सचिव- सुरेश कटारे, सचिव- लक्ष्मी गायकवाड, उपसचिव- प्रकाश ससाणे, उपसचिव- सचिन घेगंट, खजिनदार- शैलेद्र दिपक, खजिनदार- शामा चंडालिया, उपखजिनदार- संतोष भालेराव, डोंबिवली शहर अध्यक्ष- विनोद सोनावणे, ग प्रभागक्षेञ सचिव- आनंद गायकवाड, जे प्रभागक्षेञ जंतुनाशक फवारणी हजेरी शेड अध्यक्ष- मनोज सावंत, नेतीवली हजेरी शेड अध्यक्ष- संतोष चौधरी, उपाध्यक्ष- सुशिल माने, कोळसेवाडी हजेरी शेड अध्यक्ष- सनमुगन मायावन, वालधुनी हजेरी शेड अध्यक्ष- शिगारवेल आरसन, ड प्रभागक्षेञ जंतुनाशक फवारणी हजेरी शेड अध्यक्ष- राजेंद्र मोरे, जरीमरी हजेरी शेड अध्यक्ष- अविनाश डोंगरे, काटेमानिवली हजेरी शेड अध्यक्ष- सुरेश मांडवे, महिला अध्यक्षा सविता जाधव, खडेगोळवली हजेरी शेड अध्यक्ष- राजू बारीया, फ प्रभागक्षेञ भाजीमार्केट हजेरी शेड अध्यक्ष- दिनेश देसले, चोळेगांव हजेरी शेड अध्यक्ष- प्रकाश डाबेराव, पाथर्ली हजेरी शेड अध्यक्ष- श्रीकांत जाधव, उपाध्यक्ष- जनार्दन काळण आदीचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे भाग क्षेत्र कार्यकारणीमधील प्रभागक्षेञ अध्यक्ष- सुनिल जाधव, ब प्रभागक्षेञ अध्यक्ष- विजय चव्हाण, क प्रभागक्षेञ अध्यक्ष- राजेश भोईर, जे प्रभागक्षेञ अध्यक्ष- संजय खरे, जे प्रभागक्षेञ उपाध्यक्ष- रमेश दळवी, ड प्रभागक्षेञ अध्यक्ष- भाऊसाहेब वाघमारे, ड प्रभागक्षेञ सचिव- चंद्रकांत जाधव, डप्रभागक्षेञ उपाध्यक्ष- विनोद बारीया, फ प्रभागक्षेञ अध्यक्ष- राजू माळवे, ह प्रभागक्षेञ अध्यक्ष- विनोद सेजवल, ग प्रभागक्षेञ अध्यक्ष- प्रकाश जाधव यांची निवड घोषित करण्यात आली.