महानगर सफाई कर्मचारी संघाचा कामगार मेळावा संपन्न

महानगर सफाई कर्मचारी संघाचा कामगार मेळावा संपन्न

डोंबिवली (प्रतिनिधी) : महानगर सफाई कर्मचारी संघ आयोजित केडीएमसी युनिटच्या वाहन चालक-सफाई कर्मचाऱ्यांचा मेळावा शुक्रवारी डोंबिवली पूर्वेतील धर्मवीर आंनद दिघे हाँल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

गांधीनगर चौकातील धर्मवीर आंनद दिघे हाँल येथे संपन्न झालेल्या सदर मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून महानगर सफाई कर्मचारी संघाचे संस्थापक-अध्यक्ष भारत गायकवाड, सल्लागार मधुकर वाल्हेकर, उपाध्यक्ष डाँ. रविंद्र जाधव, कायदेविषयक सल्लागार अँड. अविनाश खोब्रागडे, उपाध्यक्ष रामचंद्र तायडे, अमित साळवे, प्रविण बेटकर, ठाणे जिल्हा सचिव सुधिर राणे, नहीम खान आदी उपस्थित होते. याप्रसंगी सदस्यांना संबोधित करताना प्रदेश अध्यक्ष भारत गायकवाड यांनी सफाई कर्मचारी, वाहन चालकांच्या समस्या व त्यांच्या मागण्यांबाबत मार्गदर्शन केले. आपले हक्क अधिकार मागत असताना कर्तव्य पूर्ण करण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कल्याण डोंबिवली महापालिका युनिटचे अध्यक्ष दिपक तायडे, उपाध्यक्ष दत्ता पाटील, डोंबिवली शहर अध्यक्ष विनोद सोनावणे, उपाध्यक्ष सिध्देश कडूसकर, खजिनदार शैलेद्र दिपक, उपसचिव प्रकाश ससाणे, सचिन घेगंट, विशाल एक्सपर्ट केडीएमसी युनिट अध्यक्ष दिपक दवे, विशाल एक्सपर्ट केडीएमसी युनिट डोंबिवली शहर अध्यक्ष नितीन काळण आदींनी परिश्रम घेतले.