सीबीएसइ नॅशनल जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व

सीबीएसइ नॅशनल जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व

ठाणे (प्रतिनिधी) :
खेलगाव पब्लिक स्कुल, प्रयागराज येथे नुकत्याच झालेल्या  सीबीएसइ नॅशनल जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप २०१९-२० रिदमीक जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी लक्षणीय यश मिळवले. एकूण  १३ सुवर्ण पदके, ६ रजत आणि ५ कांस्य पदके मिळवत या स्पर्धेवर आपला ठसा उमटवला.

११ वर्षांखालील गटात मृदुला पाटील ३ सुवर्ण, १ रजत, १४ वर्षाखालील गटात संयुक्ता काळे ५ सुवर्ण, स्पृहा साहू ४ रजत १ कांस्य,  इरा रावत १ रजत, २ कांस्य, आर्या कदम १ कांस्य, १७ वर्षाखालील गटात अस्मि बदडे ५ सुवर्ण, दुर्गा रोकडे १ कांस्य अशा पदकांची कमाई केली.

संयुक्ता, अस्मि, स्पृहा, आर्या, दुर्गा, मृदुला या सर्व मुली आंतरराष्ट्रीय खेळाडु कोच व पंच कु. पूजा सुर्वे व मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथे फिनिक्स जिम्नॅस्टिक ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. हे प्रशिक्षण आर्य क्रीडा मंडळ, संस्कार पब्लीक स्कुल व श्रीरंग विद्यालय या तीन ठिकाणी दिले जाते.