कंत्राटदार महासंघाच्या मुंबई विभाग अध्यक्षपदी मंगेश आवळे

कंत्राटदार महासंघाच्या मुंबई विभाग अध्यक्षपदी मंगेश आवळे

ठाणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी मंगेश शंकर आवळे यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

मंगेश आवळे हे ठाणे येथील शासकीय कंत्राटदार आहेत. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या मुंबई विभागीय संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंगेश आवळे यांची विभागीय अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. आपल्या निवडीनंतर आवळे यांनी मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील लहानमोठ्या कंत्राटदारांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयंत्न करणार असल्याचे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

आवळे हे मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल मराठा सेवा संघाचे नेते बाळकृष्ण परब, कोकण विभाग अध्यक्ष नितीन मोकाशी, आम आदमी पार्टीचे कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड, संभाजी ब्रिगेडचे ठाणे (मध्य) जिल्हा अध्यक्ष अमित केरकर, मराठामार्गचे प्रतिनिधी नारायण चव्हाण, ठाणे शहर मराठा सेवा संघाचे संतोष मोरे आदींनी अभिनंदन केले आहे.