तरुणीशी अश्लील संभाषण करणाऱ्या इसमाला महिलांनी दिला चोप 

तरुणीशी अश्लील संभाषण करणाऱ्या इसमाला महिलांनी दिला चोप 

आंबिवली (प्रतिनिधी) :
एका १९ वर्षीय तरुणीशी अश्लील संभाषण करीत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या विकृत तरुणाला परिसरातील संतप्त महिलांनी चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना कल्याण जवळील अटाळी भागात शनिवारी घडली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अटाळी परिसरात असणाऱ्या धीरज राजपूत (५५) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या परिचयाची असणाऱ्या एका तरुणीला या इसमाने ‘तुमच्या बिल्डींगमध्ये रूम खाली आहे का, अशी विचारणा करीत गेल्या काही दिवसापासून मला शरीरसुख नसल्याचे सांगून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. सदर तरुणीने हा प्रकार तिने आपल्या आईला सांगितला. ही घटना आजूबाजूच्या महिलांना समजताच संतप्त झालेल्या या महिलांनी धीरजला चप्पल व खराट्याने मारहाण केली. त्यानंतर या महिलांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याला मारहाण करणाऱ्या महिलां विरोधातही अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक वारंगडे करीत आहेत.