मराठा समाजाला न्याय-हक्क मिळवून देण्यासाठी मराठा सेना कटिबद्ध- अरविंद मोरे

मराठा समाजाला न्याय-हक्क मिळवून देण्यासाठी मराठा सेना कटिबद्ध- अरविंद मोरे

कल्याण (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खा. संभाजीराजे छत्रपती यांनी शासनाला निर्णायक इशारा दिला असतानाच या पार्श्वभूमीवर मराठा सेना देखील छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण आणि मराठा समाजाला न्याय-हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील, अशी घोषणा मराठा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा कल्याण येथील माजी नगरसेवक अरविंद मोरे यांनी येथे केली आहे.

सहा जूनपर्यंत आरक्षणा संदर्भात भूमिका घ्या, अन्यथा रायगडावरून आंदोलन करू, असा इशारा संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा सेनेची भूमिका स्पष्ट करताना मोरे यांनी वरील प्रतिपादन केले आहे.