कल्याण पूर्वेत शहीद दिन साजरा

कल्याण पूर्वेत शहीद दिन साजरा

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पूर्व येथील महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयासमोरील क्रांतिकारक स्मारक येथे शहीद दिनानिमित्त क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले. 

सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्या सहयोग सामाजिक संस्था आणि सुप्रिया आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कल्याण  जिल्हा अध्यक्ष डॉ. जगन्नाथ शिंदे तसेच महापालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे हे उपस्थित होते. यावेळी शहीद भगत सिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या देशभक्तीचे स्मरण करीत त्यांना अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी सहयोग सामाजिक संस्थेचे विजय प्रभाकर भोसले, सुप्रिया आय हॉस्पिटलचे डॉ. सुदर्शन पाटील, प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोगांडे, नगरसेविका शीतल मंढारी, स्वच्छता आरोग्य निरीक्षक ल. के.  पाटील, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, जाणीव संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत, अनिता पाटील, अमोल साळुंखे उपस्थित होते.  

तसेच यावेळी जवळील डॉ. भुजबळ दवाखान्या समोरील ट्रान्सफार्म येथील कचराकुंडी हटवून सदर परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले. विजय भोसले यांनी परिसरातील नागरिकांना आपला परिसर स्वच्छ राखण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.