नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र शिबीर संपन्न

नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र शिबीर संपन्न

कल्याण (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू आहे. मात्र लॉकडाऊन शिथिल करत अत्यावश्यक असणाऱ्या नागरिकांना आपआपल्या मूळ ठिकाणी परत जाण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना परत जाण्यासाठी परवानगी घेण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना हे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने, नागरिकांना अडचणीचे ठरत होते. ही बाब लक्षात घेत भाजपा प्रदेश सचिव तथा कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी गरजूंना तातडीने वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले. तसेच त्यांना नागरिकांना प्रमाणपत्र, झोन पत्रही उपलब्ध करून देण्यास पुढाकार घेतला आहे.

नरेंद्र पवार यांच्या कल्याण पश्चिमेतील जनसंपर्क कार्यालयात व बल्याणी येथे नुकतेच या शिबिराचे आयोजन केले होते. भारतीय जनता पार्टीचे व भाजपा प्रणित केमिस्ट ड्रगिस्ट फार्मासिस्ट डॉक्टर्स, स्टुडंट्स फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी दिवसभर २६०० पेक्षा जास्त गरजू नागरिकांना प्रमाणपत्र दिले. कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक मजूर व काही कामानिमित्त आलेले नागरिक अडकून पडले होते. त्यांना मूळ ठिकाणी जाण्यासाठी यामुळे मोठी मदत होणार आहे. गर्दी न करता सोशल डिस्टन्स ठेऊन तज्ञ डॉक्टर व कोरोना योद्धयांच्या साहाय्याने तपासणी करून तातडीने प्रमाणपत्र मिळवून दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी नगरसेविका उपेक्षा भोईर, शक्ती भोईर, बुधाराम सरनोबत, योगेश मिश्रा, डॉ. उपेंद्र डहाके, फाऊंडेशनचे सचिव तुषार मोरे, रवी गुप्ता, डॉ. पोटदुखे, डॉ. गंगान, डॉ. वंदन महाजन, पराग मिसार, डॉ. चेतन वैद्य,  डॉ. रितेश शिंदे, डॉ. पागोटे, यशवंत साळवे, महेंद्र मिरजकर, संदीप गायकवाड, हेमेंत गायकवाड, विनायक भगत, संतोष शिंगोळे, मुन्ना रईस, जक्की पाकुर्डे, अनंता पाटील, विवेक जाधव, आनंद पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सक्रियपणे मदत केली.