कल्याणमधील पत्रकारांच्या घरांसाठी आमदार भोईर यांचा पाठपुरावा

कल्याणमधील पत्रकारांच्या घरांसाठी आमदार भोईर यांचा पाठपुरावा

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण तालुक्यातील ज्या पत्रकारांना स्वत:चे घर नाही अशा पत्रकारांना शासनाकडू घरे मिळवीत याकरिता आपण मुख्यमंत्र्यांना एक वर्षापूर्वीच पत्र दिले आहे. त्याचा आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहे. माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत येथील पत्रकारांना घरे मिळतील, असा विश्वास कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार दिनानिमित्त येथील राजा हाँटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.

प्रेस क्लब, कल्याणच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आ. भोईर, लोकमतचे सहाय्यक संपादक दुर्गेश सोनार उपस्थित होते. त्यांचेसोबत अध्यक्ष आनंद मोरे, सचिव विष्णुकुमार चौधरी व्यासपिठावर होते. महापालिकेच्या सहाय्यक जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे याही उपस्थित होत्या. दुर्गेश सोनार यांनी यावेळी पत्रकारांना समयोचित मार्गदर्शन केले. पत्रकार शकील शेख यांना वैद्यकीय मदतीसाठी आर्थिक यावेळी देण्यात आली तर ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भानुशाली व नवीन भानुशाली यांचा पत्रकारितेतील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रमेश दुधाळकर, प्रशांत माने, राजू टपाल, विलास भोईर, प्रविण आंब्रे, रवि चौधरी, कलीम शेख, अतिश भोईर यांच्यासह सर्वच पत्रकारांचा कोरोना योद्धा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव भामरे यांनी केले तर आभार सुचिता करमरकर यांनी मानले.