लॉकडाऊनमध्ये आमदारांचा वाढदिवस असा झाला साजरा...

लॉकडाऊनमध्ये आमदारांचा वाढदिवस असा झाला साजरा...

ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांचा वाढदिवस समतानगरमधील युवासेना शाखा अधिकारी सतीश आंब्रे यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.

आ प्रताप सरनाईक यांचा २५ एप्रिल रोजी वाढदिवस होता. कोरोनाच्या संकटात अडकलेल्या गोरगरीब जनतेला मदत करून व जाहिरातबाजी न करता लोकांना आवश्यक चीजवस्तूंची मदत करावी, असे आवाहन आ. सरनाईक यांनी केले होते. त्यांच्या आव्हानानुसार युवासेना शाखा अधिकारी सतीश आंब्रे यांनी या आपल्या जीवाची परवा न करता कोरोनाच्या बंदोबस्तावर असलेल्या व आपले कर्तव्य बजावणाऱ्या वर्तकनगर येथील पोलिसांना सॅनिटायजर व मास्कचे वाटप करीत आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा केला. 

आंब्रे यांनी आ. सरनाईक यांचा वाढदिवस असा अनोख्या पद्धतीने साजरा करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसैनिक एकनाथ घारे, प्रवीण सावंत, किरण म्हापदी, महेश बोधे, अब्बू सय्यद, सुशील भामरे आदी कार्यक्रते यावेळी उपस्थित होते.