मनसे नगरसेविकेने बाजारपेठेत उभारला निर्जतुकीकरण कक्ष

आंबिवली (प्रतिनिधी) : ‘तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो’ हे सूत्र अवलंबित आंबिवली येथील मोहोने कोळीवाडा प्रभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सुनंदा मुकुंद कोट यांनी कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोहोने येथील मुख्य बाजारपेठेमध्ये सार्वजनिक निर्जतुकीकरण फवारणी कक्ष (Sanitization Unit) उभारले आहे. 

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षततेसाठी उभारण्यात आलेल्या या सार्वजनिक निर्जतुकीकरण फवारणी कक्षाचे नगरसेविका सुनंदा कोट, मनसेचे विभाग अध्यक्ष राहुल कोट व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत औपचारिक लोकार्पण करण्यात आले. नागरिकांनी या सार्वजनिक निर्जतुकीकरण फवारणी कक्षाच्या सुविधेचा फायदा घ्यावा आणि स्वत:ला व आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.