मनसेने केली खड्ड्यांची पाहणी;  आ. राजू पाटील यांचा केडीएमसीला इशारा

मनसेने केली खड्ड्यांची पाहणी;  आ. राजू पाटील यांचा केडीएमसीला इशारा

डोंबिवली (प्रतिनिधी) : आता सहनशीलतेचा अंत झाला आहे. १५ दिवसात खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भरू, अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील चक्कीनाका ते नेवाळी दरम्यानच्या रस्त्याची बुधवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत महापालिकेला १५ दिवसांची मुदत दिली आहे. आता सहनशीलतेचा अंत झाला आहे. येत्या १५ दिवसात खड्डे भरा, अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भरू, असा इशारा आमदार राजू पाटील यांनी यावेळी महापालिका अधिकारी-ठेकेदारांना दिला.

सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासनावर टीका करत टक्केवारीत सगळे अडकले आहे. सत्ताधारी वाघाचा वाटा खाताहेत. अधिकारी-ठेकेदारावर कारवाई करून काय होणार- वाघाचा वाटा जातो कुणाकडे, असा टोला शिवसेनेला आ. पाटील यांनी लगावला आहे.

खड्ड्यांसाठी १२ कोटींच्या निविदा 

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अंतर्गत, तसेच डांबरी रस्त्याची यंदाच्या पावसाळयात  दुरवस्था झाली. काही रस्त्यावर तर जणू खड्ड्याची स्पर्धा लागली काय असे चित्र दिसत आहे. यंदा महापालिकेने बारा कोटीच्या निविदा काढल्या होत्या. यंदा पावसाळ्यातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र ही खड्डे भरण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. परिणामी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तक्रारी निवेदने आंदोलनं करून देखील प्रशासन दाद देत नसल्याने बुधवारी मनसे आमदार राजू पाटील यांनीशहरातील रस्त्यांची पाहणी केली.