डोंबिवलीत मनसेचे ‘खड्डे भरो’ आंदोलन

डोंबिवलीत मनसेचे ‘खड्डे भरो’ आंदोलन

डोंबिवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अंगीकृत संघटनां पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने श्रमदान करीत गुरुवारी प्रातिनिधिक स्वरूपात डोंबिवली शहरातील एमआयडीसीमधील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे वेटमिक्स टाकून रोलरच्या साह्याने सपाटीकरण करीत भरण्यात आले.

सदर ‘खड्डा भरो’ आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश गोपीनाथ भोईर, जिल्हा सचिव प्रकाश माने, जिल्हा उपाध्यक्ष सुदेश चुडनाईक, शहर अध्यक्ष मनोज घरत, माजी नगरसेविका सरोज प्रकाश भोईर, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा दिपीका पेडणेकर, महिला सेनेच्या उपशहर अध्यक्षा सपना पाटील, अरुण जांभळे, सुभाष कदम, योगेश पाटील, हरीश पाटील, संजीव ताम्हणे, मिलिंद म्हात्रे, परेश भोईर, दिप्तेश नाईक, सुहास काळे, प्रितेश महामूणकर, चिन्मय वारींगे, उदय वेळस्कर, कुणाल मौर्य, नैतिक जोशी, निशांत चिटणीस, कौतुक माळशेज, राजेश लिंगायत, ओम लोके, तेजस सैंद्रे, विराज मढवी, शशिकांत कोकाटे,  मिलिंद गायकवाड, श्रीकांत वारिंगे, रमेश यादव, विशाल बढे, रवी गरुड, कदम भोईर, प्रकाश थोरात, सुरेश शिंदे, संकेत तांबे, संजय सरमळकर, महेश पांचाळ, अनिल वलेकर, संजय चव्हाण, सचिन माने, अविनाश चिडले, संजय बाविस्कर, अजय घोरपडे, संदीप म्हात्रे अनेक महाराष्ट्र सैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.