दक्षिण कोकणात १४ जूनपर्यंत मान्सून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन

दक्षिण कोकणात १४ जूनपर्यंत मान्सून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : 

केरळात ८ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. १४ जूनपर्यंत दक्षिण कोकणात मान्सून दाखल होईलअसा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र राज्यातील उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनाला विलंब होऊ शकतो असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विदर्भमराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात ११ जूनपर्यंत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल आणि काही भागांमध्ये दुपारनंतर मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस पडेल. राज्यातील बहुतांश भागात किमान १५ जूनपर्यंत तरी मान्सूनचे आगमन अपेक्षित नसल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस हा सलग पडत नाही. या काळात तापमान अधिक राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि हवामान तज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढचे नियोजन करावेअसे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याचबरोबरवादळी पावसादरम्यान लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावेअसे आवाहन देखील करण्यात आले आहे.