आंबिवली येथे भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदारांच्या हस्ते उद्घाटन

आंबिवली येथे भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदारांच्या हस्ते उद्घाटन

आंबिवली (प्रतिनिधी) : आंबिवली येथील मोहोने येथे भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन माजी मंत्री जगन्नाथ पाटील व भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

परिवहन समितीचे माजी सभापती रमेश कोनकर व व भाजपचे मंडळ सरचिटणीस प्रमोद घरत यांच्या पुढाकाराने सदर जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपचे कल्याण पश्चिमचे शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, ठाणे विभाग सरचिटणीस राजाभाऊ पातकर, ज्येष्ठ नेते दिनेश तावडे, माजी मंडळ अध्यक्ष सुभाष पाटील, महिला अध्यक्षा मनिषा केळकर, संतोष शिंगोळे, सुधीर कश्यप, जनार्दन पाटील, संदीप गायकवाड, संदीप पाटील, विनायक भगत, श्रीकांत पाटील, हेमंत गायकवाड, शैलेश शेट्टी आदींसह पदाधिकारी-कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी मारुती कालप्पा कोनोरी, राहुल नारखेडे, प्रवीण वाघमारे, प्रमोद जाधव, तुळशिराम सावंत, मंगला सावंत, निवृत्ती रतन पाटील यांची पक्षाच्या विविध पदांवर नियुक्त करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ सरचिटणीस प्रमोद घरत यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश टकले यांनी केले.

खासदारांनी केली सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची

यावेळी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार कपिल पाटील यांच्या मागणीनुसार व प्रयत्नाने मंजूर केलेल्या मोहोने येथील १३ कोटी रुपये खर्चाच्या मोहोने गेट ते स्मशानभूमी व मोहोने गेट ते ४७ फाटकपर्यंतचे रस्ते नुकतेच सिमेंट काँक्रीटचे करण्यात आले. या रस्त्यांच्या कामाची यावेळी खासदार कपिल पाटील यांनी  पाहणी केली.