महावितरणच्या कोकण प्रादेशिक संचालकपदी अंकुश नाळे

महावितरणच्या कोकण प्रादेशिक संचालकपदी अंकुश नाळे

​​​​​कल्याण (प्रतिनिधी) :

महावितरणच्या कोकण प्रादेशिक संचालक (प्रभारी) पदी अंकुश नाळे रुजू झाले आहेत. त्यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला. यावेळी कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख, कोकण परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे यांनी त्यांचे स्वागत केले. यापूर्वीचे प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर मुख्यालयाने त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली  आहे.

 अंकुश नाळे हे मुळचे फलटण (जि.सातारा) येथील असून महावितरणमध्ये अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. त्यानंतर त्यांची मुख्य अभियंतापदी निवड झालेली आहे. मुख्य अभियंता म्हणून त्यांनी चंद्रपूर, सांघिक कार्यालय, मुंबई येथे कामपाहिले आहे. तसेच कार्यकारी संचालक (वितरण) (प्रभारी) पदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे. अंकुश नाळे यांनी वालचंद कॉलेज,सांगली या महाविद्यालयातून विद्युत अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर घेतली असून त्यानंतर एम.ई.(इलेक्ट्रिकल),डी.बी.एम. अशा पदव्या संपादन केल्या आहेत. 

कोकण प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समवेश असून या जिल्ह्यातील सुमारे ८८ लाख ग्राहकांना महावितरण सेवा पुरवते. येथील पदभार स्वीकारताना मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की,ग्राहक हा महावितरणचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यास आम्ही बांधील आहोत. याचबरोबर महसूल वाढीसाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.