मुंबई शहरातील जमिनीची मिळकत पत्रिका प्रॉपर्टी कार्ड मोबाईल अॅपवर

मुंबई शहरातील जमिनीची मिळकत पत्रिका प्रॉपर्टी कार्ड मोबाईल अॅपवर

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभागांतर्गत जमिनींची मिळकत पत्रिका प्रॉपर्टी कार्ड आणि भू-कर क्रमांकनिहाय जमिनीचा तपशिल जमीनधारकांना आता घरबसल्या मोबाईल अॅपवर पाहता येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ई-प्रॉपर्टी कार्ड (ePropertycard) हे अॅप नागरिकांसाठी विकसित केले असून या अॅपचे मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी नुकतेच लोकार्पण केले. 

या अॅपची सुविधा मुंबई शहर जिल्ह्यासाठी असून पुढील काळात संपूर्ण राज्यासाठी अॅप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर. सहजरित्या उपलब्ध होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना किंवा जमीनधारकांना जमिनीचा नकाशा, सीटी सर्व्हे क्रमांक, जमिनीचे क्षेत्र आणि प्रकार, करनिर्धारणा तसेच जमीनधारकाची माहिती कळेल.हा अॅप अतिशय चांगला असून सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने निर्मित केलेल्या या अॅपचा नागरिकांनी उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निवतकर यांनी यावेळी केले.

कार्यालयाच्या mumbaicity.gov.in prcmumbai.nic, in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इज ऑफ ड्युईंग बिझनेस उपक्रमांतर्गत मुंबई शहर एनआयसीने 'ई-प्रॉपर्टी कार्ड (ePropertycard) या अॅपची निर्मिती केली असून यासाठी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी कविता पाटील आणि अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी अनिल राठोड यांनी हे अॅप विकसित केले आहे.