अनंत रिजेन्सी-ठाणगेवाडी रस्त्याचे राजमाता जिजामाता भोसले यांचे नाव

अनंत रिजेन्सी-ठाणगेवाडी रस्त्याचे राजमाता जिजामाता भोसले यांचे नाव

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शुक्रवारी बोलाविण्यात आलेल्या महासभेत नामकरणाचे अनेक विषय पटलावर घेण्यात आले आहेत. यामध्ये कल्याण पश्चिमेतील अनंत रिजेन्सी ते ठाणगेवाडी या रस्त्याला राजमाता जिजामाता भोसले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव असून सदर प्रस्ताव मंजूर होणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

रामबाग प्रभागात येणाऱ्या अनंत रिजेन्सी ते ठाणगेवाडी या रस्त्याला राजमाता जिजामाता भोसले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी येथील मराठा प्रतिष्ठान तसेच मराठा सेनेच्या वतीने करण्यात करण्यात आली होती. येथील अभ्यासू स्थानिक नगरसेवक सचिन बासरे यांनी स्थानिक जनतेच्या भावना विचारात घेऊन सदर रस्त्याला राजमाता जिजामाता भोसले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शुक्रवारी होणाऱ्या महासभेत मांडला आहे. या प्रस्तावाला सर्वसंमतीने मंजुरी मिळणार असल्याचे संकेत आहेत. जनतेच्या मागणीचा आदर करून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारे नगरसेवक बासरे यांचे आम्ही स्थानिक जनतेच्या वतीने आभार व्यक्त करीत असल्याची प्रतिक्रिया मराठा प्रतिष्ठान आणि मराठा सेनेचे पदाधिकारी रविंद्र कदम यांनी व्यक्त केली आहे.