एरोस्केटोबॉल एसजीएफआयचे राष्ट्रीय शिबिर संपन्न

एरोस्केटोबॉल एसजीएफआयचे राष्ट्रीय शिबिर संपन्न

कल्याण (प्रतिनिधी) : एरोस्केटोबॉलचा स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया कडून आयोजित केलेले राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरात एरोस्केटोबॉल ऑफ इंडिया फेडरेशन ऑफ इंडिया कडून उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना, पंच, कोचेस यांना खेळाचे नियम व प्रात्यक्षिक करून दाखविले.

सदर शिबिरात स्कूल गेम्स फेडेरेशन ऑफ इंडिया चे निरीक्षक व इतर मान्यवर देखील उपस्थित होते. या शिबिरात मार्क भस्मे व सुनील कॉद्रस व चेतन पागवाड यांनी खेळाचे नियम सांगितले व प्रत्यक्ष मैदानावर देखील मुलांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. महाराष्ट्र असोसिएशनतर्फे ऑनलाइन शिबिर प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व त्याचे आयोजन देसाई क्लब, कोंडावा, पुणे व ऑक्सफोर्ड स्कूल, चारकोप, कांदिवली, मुंबई येथे केले होते.

या शिबिरात महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, ठाणे, पालघर, जळगाव, बीड, परभणी, रायगड येथील क्रीडाशिक्षक उपस्थित होते तसेच इतर राज्यातील म्हणजे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, बिहार, ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, पंजाब, कर्नाटक, विद्याभारती स्कूल, इंटरनॅशनल बोर्ड, सी बी एस सी बोर्ड, आय बी एस ओ स्कूल आणि आय पी एस सी स्कूल, गुजराथ येथील क्रीडाशिक्षक उपस्थित होते.  एरोस्केटोबॉल हा गेम लवकरच स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता भेटून मिळून शालेय खेळांमध्ये समाविष्ट होणार आहे.