कोकण इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन कल्याणमध्ये

कोकण इतिहास परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन कल्याणमध्ये

ठाणे (प्रतिनिधी) : कोकण इतिहास परिषदेचे ११ वे राष्ट्रीय अधिवेशन बी. के. बिर्ला कॉलेज, कल्याण, जिल्हा ठाणे येथे दि. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आले आहे. 

सदर अधिवेशनास महाराष्ट्र व देशाच्या विविध भागातून नामवंत इतिहास तज्ञ, संशोधक, इतिहास अभ्यासक,  प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या अधिवेशनात प्रामुख्याने कोकणची लोक-संस्कृती व कोविडमुळे बदललेली परिस्थिती या विषयावर चर्चा सत्र व शोधनिबंधाचे वाचन व सादरीकरण होणार असल्याची माहिती अध्यक्ष सदाशिव टेटविलकर, सचिव डॉ. विद्या प्रभू यांनी दिली आहे.