राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने बळीराजासाठी दिला प्रदेशाध्यक्षांकडे ११ हजारांचा धनादेश 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने बळीराजासाठी दिला प्रदेशाध्यक्षांकडे ११ हजारांचा धनादेश 

कल्याण (प्रतिनधी) :
अवकाळी पावसाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते प्रविण मुसळे यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला.

राज्यात अतिवृष्टी, पूर परिस्थिती व परतीच्या पावसामुळे हातचे गेलेले पिक, कुटुंबावर कोसलेला डोंगर, चाऱ्याअभावी जानावारांची होणारी दैना यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी पुढे आली आहे. ही परीस्थिती लक्षात घेता संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त निधी संकलन करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्याला सर्वप्रथम प्रतिसाद देत कल्याण शहरातील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी पदाधिकारी मुसळे यांनी नुकतीच जयंत पाटील यांची भेट घेत त्यांच्याकडे बळीराजाच्या मदतीसाठी ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. 

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर रोजी कल्याण जिल्ह्यातून बळीराजासाठी निधी संकलन करून तो पक्षाकडे देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.