राष्ट्रवादीकडून कल्याण पूर्वेतून आप्पा शिंदे तर पश्चिमेत रमेश हनुमंते?

राष्ट्रवादीकडून कल्याण पूर्वेतून आप्पा शिंदे तर पश्चिमेत रमेश हनुमंते?

कल्याण (प्रतिनिधी) :
आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी झाली असून काही जागांचे वाटप देखील झाले आहे. त्यानुसार कल्याण पश्चिम व कल्याण पूर्व हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला तर कल्याण ग्रामीण व डोंबिवली हे दोन मतदारसंघ हे कॉंग्रेसला सोडण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधान परिषदेतील विद्यमान आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे हे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

तसेच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून कल्याण जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश हनुमंते यांचे नाव आघाडीवर असून त्यांनाच तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीणमधून कॉंग्रेस ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते भाजप व परत कॉंग्रेस असा प्रवास केलेले रमेश पाटील हे कॉंग्रेसतर्फे उभे राहणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संतोष केणे यांचे नाव आघाडीवर आहे.