सिटी पार्क संदर्भात राष्ट्रवादीने घेतली केडीएमसीच्या आयुक्तांची भेट 

सिटी पार्क संदर्भात राष्ट्रवादीने घेतली केडीएमसीच्या आयुक्तांची भेट 

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याणमधील गौरीपाडा येथे उभारण्यात येत असलेल्या सिटी पार्क संदर्भात राष्ट्रवादीच्या अर्बन सेलने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. सिटी पार्क आणि आसपासच्या जागेत नेहमी उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. 

कल्याण पश्चिमेत गौरीपाडा सुरू असलेला सुमारे १२५ कोरोड रूपये खर्च अपेक्षित असलेला सिटी पार्क हा मनपाचा ड्रीम प्रोजेक्ट सलग दुसर्या वर्षी पाण्याखाली गेल्याने हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. महापालिका आयुक्तांना २२ जुलै रोजी सिटी पार्कमध्ये आलेल्या पुराचे फोटो व विविध वृत्तपत्रांनी या विषयाची त्यावेळी घेतलेली गंभीर दखल यांची कात्रणे देण्यात आली. सिटी पार्कमध्ये नेहमी पुर परिस्थिति निर्माण होत असते त्यामुळे करोडो रुपये खर्च करुन सुशोभिकरण करणे किती योग्य आहे, याचा पुनर्विचार आयुक्तांनी करण्याची गरज असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने सांगितले.