मुंबईतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह अनेकांचा संभाजी ब्रिगेड पक्षात प्रवेश 

मुंबईतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह अनेकांचा संभाजी ब्रिगेड पक्षात प्रवेश 

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील सरचिटणीस कादीर नझीर शेख यांच्यासह चांदिवली विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास लक्ष्मण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर मध्य मुंबई जिल्हा सचिव सुदाम साहिल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणीस व सामाजिक कार्यकर्ते कादीर नझीर शेख यांचा राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत संभाजी ब्रिगेडमध्ये जाहीर प्रवेश झाला. तसेच चांदिवली विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत चंद्रकांत निंबाळकर यांनी आपल्या समर्थकांसह संभाजी ब्रिगेडमध्ये जाहीर प्रवेश केला. राणे यांच्या हस्ते निंबाळकर यांना चांदिवली विधानसभेच्या संघटकपदी नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

कादीर नजीर शेख यांनाही लवकरच योग्य जवाबदारी दिली जाईल, असे राणे यांनी जाहीर केले. यावेळी उत्तर मध्य मुंबई जिल्हा सहसचिव नयन प्रजापती, शाखा अध्यक्ष सचिन वाकोडे, सुहास हनुमंत यादव, रोशन सिताराम कांबळे, राजन कांबळे, सुदेश अण्णा, विरल जैन, गंगाराम गजधने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.