कल्याणात राष्ट्रवादीचा सेनेला धक्का !

कल्याणात राष्ट्रवादीचा सेनेला धक्का !

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण पूर्वेतून शिवसेनेचे उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक प्रकाश तरे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खा. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तरे यांना कल्याण पूर्वेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी देण्याचे संकेत मिळत असून तरे यांना आपल्याकडे खेचून राष्ट्रवादीने सेनेला धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

मंगळवारी तरे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. तरे हे यापूर्वी खडेगोळवली प्रभागातून निवडून आले होते. तसेच त्यांनी सेनेचे उपशहर प्रमुखपद सांभाळले आहे. तरे यांना कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन शिवसेना आणि भाजप दोघानाही एकाच वेळी आव्हान देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असल्याचे संकेत मिळत आहेत.