या गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी राष्ट्रवादीची ठाण्यात स्वाक्षरी मोहीम

या गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी राष्ट्रवादीची ठाण्यात स्वाक्षरी मोहीम

ठाणे (प्रतिनिधी) : महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना एक वर्षाच्या आत फाशीची कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर सह्यांची मोहीम राबवण्यात आली.

या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्वाक्षरी मोहिमेत कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षा पुजा शिंदे, मानपाडा-माजिवाडा ब्लॅाक कार्याध्यक्षा अश्विनी वैद्य, चेंदणी कोळीवाडा विभाग अध्यक्षा नंदिनी मुदालिया, कळवा ब्लॅाक अध्यक्षा श्रुती कोचरेकर, पुजा दामले, सोनी चौहान, विद्या पाटिल, सिमा बडदे, तमन्ना अशरफी, नूरी खान, मनिषा बोडगे आदींसह युवती सहभागी झाल्या होत्या.