नीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु

नीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु

ठाणे  (प्रतिनिधी)  : 
ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात टप्याटप्याने नव्या बस दाखल होत असल्याने नवनवीन मार्गावर प्रशासनाकडून बसफेऱ्या सुरू करण्याचा येत आहे. ठाण्याच्या मानपाडा येथील नीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन बससेवा सुरु करण्यात आली आहे. 

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात टप्याटप्याने नवीन बस दाखल होत असल्याने  ठाणे परिवहन सेवेच्या वतीने अजून काही मार्गवर बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे यांच्या मागणीनुसार नीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन अशी नवीन बससेवा टीएमटी प्रशासनाच्या वतीने नुकतीच सुरु करण्यात आली. सदर बससेवेचे उदघाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, भाजपचे गटनेते नारायण पवार, नवयुग मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश आंब्रे, नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे आदी उपस्थित होते.

ठाण्यातील मानपाडा येथील नीलकंठ ग्रीन येथून सुटणाऱ्या या बससेवा टिकुजिनीवाडी, खेवरा सर्कल, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, वसंतविहार चौक, गांधीनगर, माजिवडा, कॅसल मील, जेल तलाव, कोर्ट नाका, ठाणे स्टेशन या मार्गावर चालवण्यात येणार आहे. तसेच या सेवेमुळे टिकुजिनीवाडी, खेवरा सर्कल, काशिनाथ घाणेकर येथील प्रवाशांनाही फायदा होणार आहे.  नीलकंठ ग्रीन ते बोरिवली बस सेवा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे स्थानिक  नगरसेविका आंब्रे यांनी यावेळी सांगितले.