कोकणातील भटका विमुक्त समाज शासकीय मदतीपासुन वंचित - नरेंद्र पवार

कोकणातील भटका विमुक्त समाज शासकीय मदतीपासुन वंचित - नरेंद्र पवार

कल्याण (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी कोकणामध्ये तौक्ते चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, यामध्ये शेतकरी वर्ग व्यवसायिक वर्ग सर्वांचेच नुकसान झालं होते. त्याचप्रमाणे भटक्या समाजातील कुटुंबांचे देखील यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मदत म्हणून कोकणातील पाड्यांवर मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या भटका समाजाला मदत करू. त्या सर्वांनी काळजी घ्यावी, असे आव्हान भाजपा प्रदेश संयोजक भटके विमुक्त माजी आमदार नरेंद्र पवार यांनी ऑनलाइन मीटिंगमध्ये बोलताना केले.

यावेळी राष्ट्रीय भटके-विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी बोलताना महाराष्ट्रमध्ये भटके विमुक्त आघाडीची वाटचाल ही नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सुरू आहे असं मत व्यक्त केला. मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, भटके समाजास रस्त्यावर राहण्यासाठी व उदरनिर्वाह करण्यासाठी भटक्या समाजाला प्रचंड प्रमाणात संघर्ष करावा लागतो. मागल्या वर्षी यावेळेस करोना काळात भटक्या समाजाकडे राहण्याची व जेवणाची पण व्यवस्था नव्हती या वेळेसराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सेवा भारतीच्या माध्यमातून भटके कल्याण परिषद हरियाणामधील कल्याण समाज या संस्थेच्या माध्यमातून देशभरात अडकलेल्या भटक्या समाजाला मदत करुन त्यांना दोन कोटी भटक्या समाजाच्या लोकांची खाण्याची व्यवस्था केली. महाराष्ट्रमध्ये भटक्या समाजाचा राजकीय अस्तित्व धोक्यात असून त्याला योग्य दिशा भेटणे महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात समाजासाठी १००० आश्रम शाळा आहे.  गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये भटक्या समाजासाठी 3 लाख घर बांधून भटक्या समाजाला हक्काचा निवारा दिला आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा यासाठी भाजप भटके विमुक्त आघाडीने  जनजागृती केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळेस प्रास्ताविक श्रीराम इदाते यांनी केलं तर सूत्रसंचालन सहसंयोजक अशोकराव चोरमले यांनी तर आभार सहसंयोजक गोविंदा गुंजाळकर यांनी मानले. यावेळेस समाज प्रमुख मिलिद जाडकर, महिला संयोजिका उज्वला हाके, युवती संयोजिका धनश्री ढाकणे, कार्यालयमंत्री राजू खैरनार, प्रदेश सोशल मिडीया संयोजक कोंडाजी कडनर. उत्तर रायगड जिल्हा संयोजक बबन बारगजे, ठाणे विभाग संयोजक बाळा केंद्रे, कल्याण संयोजक सांगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.