आता नव्या पिढीला चकवणे अशक्य आहे - प्रा. प्रविण दवणे

आता नव्या पिढीला चकवणे अशक्य आहे - प्रा. प्रविण दवणे

ठाणे (प्रतिनिधी) :
आजची पिढी ही शिक्षकांना तपासून घेत असते. पहिल्या तीन चार ओळींतच विद्यार्थ्याला कळते की शिक्षक डबक्यात आहे की, समुद्रात त्या शिक्षकाचा किती सखोल अभ्यास आहे. आता नव्या पिढीला चकवणे हे अशक्य आहे. कारण आताची पिढी तरबेज आहे. खरा शिक्षक हा मस्टरवर नाही तर नव्या पिढीच्या डोळ्यावर सही करतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रा. प्रविण दवणे यांनी येथे केले. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने शिक्षक दिनाच्यानिमित्ताने नुकताच ठाणे जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शहनाई हॉल येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. एस. पठाण प्रमुख पाहूणे उपस्थित होते. ते म्हणाले, जगात आई वडिल आणि शिक्षक हे तीन शब्द आदर्श आहे. शिक्षक हा समाज घडवित असतो. सर उठाओ तो कोई बात बने हे गाणे त्यांनी सादर केले. याप्रसंगी विद्याश्री क्लासेसचे संचालक प्रकाश पाटील यांना शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्रातील उत्कृष्ठ् कामगिरीबद्दल आणि उत्कृष्ठ् संघटक या कार्याबद्दल कोंचिग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने सर्वोत्कृष्ट पुरस्कार ‘डॉ. ए.पी.जे अब्दुल कलम ज्ञानपीठ’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून घोडबंदर विभागाची निवड करण्यात आली. तसेच कोचिंग क्लासेसमधील सुखदेव जाधव, महेंद्र् कदम, प्रविण कदम, निलेश वामन, सुदाम केदार, अनिल चव्हाण, आयेशा खान, उत्तम झगडे आदि ३० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमाला संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष सतीश देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी अध्यक्ष भोसले सर, रायगड जिल्हाध्यक्ष अनिल काकुळते, संघटनेचे राज्य सचिव सचिन सरोदे, राज्य खजिनदार सुनील सोनार, कार्याध्यक्ष विनायक चव्हाण, सहकार्याध्यक्ष रवींद्र प्रजापती, कॉमर्स विभाग प्रमुख रवींद्र कोकाटे, राज्य कार्यकारणी सदस्य मिलिंद मोरे, विनोद हादवे, शैलेश सकपाळ, पुर्वा माने, सुदेश अरगोंडा, भारती देशमुख, बबन चव्हाण, सुभाष माळकर, ज्ञानेश्वर मांडवे, परेश कारंडे, सागर चिंचकर, संतोष गोसावी, आनंदा जाधव, मदन पाटील, सुशांत जांबळे व विविध विभागातून प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष प्रकाश पाटील आणि कार्यक्रमाचे अप्रतिम सुत्रसंचालन अनिल काकुळते आणि भारती देशमुख यांनी केले.