ओबीसी आरक्षण; महाविकास आघाडी सरकारविरोधात कल्याणात भाजपची निदर्शने

ओबीसी आरक्षण; महाविकास आघाडी सरकारविरोधात कल्याणात भाजपची निदर्शने

कल्याण (प्रतिनिधी) : सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणप्रश्नी बाजू मांडण्यात कमी पडल्याचे सांगत भाजपतर्फे नुकतीच कल्याणात महाविकास आघाडी विरोधात निदर्शने करण्यात आली. माजी आमदार आणि भाजप भटके विमुक्त आघाडीचे राज्य संयोजक नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात आली. 

ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी पडल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.