जंबुद्विपातील लिपी आणि भाषा शिकण्याची संधी 

जंबुद्विपातील लिपी आणि भाषा शिकण्याची संधी 

नवी मुंबई (प्रतिनिधी) : ज्या व्यक्तीने दगडांना सुध्दा बोलके केले ती व्यक्ती म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक जवळपास सव्वा दोन हजार वर्षे झाली त्यांचे मन उलगडणारे लेख या संपूर्ण जंबुद्विपात विखुरलेले आहेत तसेच त्यांचे मांडलिकत्व पत्करलेले या महाराष्ट्राचे पहीले ज्ञात राजे सातवाहन यांनी देखील काळाकुट्ट सह्याद्री बोलका केला ज्या भाषेत आणि लिपीत हे सर्व लिहिले गेले ती लिपी अनेक शतके अज्ञातवासात होती. अशी ही प्राचीन व दुर्मिळ झालेली लिपी शिकण्याची संधी आता इच्छुकांना प्राप्त होणार आहे.

१८ व्या शतकात भारतात आलेल्या तरूण इंग्रज अधिकारी जेम्स प्रिंसेप यांनी १८४० मध्ये या लिपीची उकल केली त्यांनी लिपीतील काही अक्षरे वाचली आणि मग सम्राट अशोक ही व्यक्तीरेखा समोर आली आणि त्यातून कळाले की इथे या भूमीवर सम्यक संबुध्द होउन गेलेत ज्यांनी सर्व मानवाच्या कल्याणासाठी धम्म सांगितला व धम्म सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून अखंड चाळीस वर्षे  चारीका केली. अशी महत्त्वाची असलेली लिपी व भाषा घरबसल्या शिकण्याची संधी नवी मुंबई  येथील लेणी अभ्यासक सूरज रतन जगताप हे इच्छुकांसाठी उपलब्ध करून देत आहेत. https://surveyheart.com/form/607974a1a7821630f0dc8806 या लिंकद्वारे इच्छुकांना या वर्गात समाविष्ट होता येणार आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी मर्यादित जागा असल्याने त्वरित नावे नोंदवावीत असे आवाहन लेणी अभ्यासक सूरज रतन जगताप ९३२०२१३४१४ यांनी केले आहे.