विश्व हिंदी दिना’ला मराठी एकीकरण समितीचा विरोध

विश्व हिंदी दिना’ला मराठी एकीकरण समितीचा विरोध

कल्याण (प्रतिनिधी) : १४ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या ‘विश्व हिंदी दिना’ला विरोध म्हणून मराठी एकीकरण समितीच्या कल्याण-डोंबिवली विभागाच्या वतीने कल्याण रेल्वे स्थानक परिसरात हातात फकल घेऊन हिंदी ही कायद्याने राष्ट्रभाषा नाही म्हणून जनजागृती करण्यात आली.

संपूर्ण देशात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे अशी अफवा पसरविले जाते. पण कायद्याचा आपण अभ्यास बारकाईने केलात तर कायद्यात कुठे ही हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असा उल्लेख आढळून येतो. हिंदी भाषा दिन साजरा करून हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळवून देण्याला विरोध म्हणून मराठी एकीकरण समितीने कल्याण रेल्वे स्थानक पश्चिम येथे हातात "हिंदी लादणे थांबवा" तसेच "हिंदी ही राष्ट्रभाषा नाही" असे फलक घेऊन जनजागृती करण्यात आली.

या निषेध आंदोलनात मराठी एकीकरण समितीचे कल्याण शहर समनव्यक भूषण पवार, कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष गणेश तिखंडे, विलास चव्हाण, प्रशांत आदी उपस्थित होते. मुळात शाळेतच मुलांना हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि ती प्रत्येक मुलाला आलीच पाहिजे अशी बीजे रेवून मराठी ह्या मातृभाषेला पर्यायी संस्कार बिंबवले जातात. कुठे तरी शाळेत हिंदी विषयी असलेली राष्ट्रभाषेची अफवा थांबली पाहिजे असे मत मराठी एकीकरण समितीचे कल्याण शहर समन्वयक भूषण पवार यांनी सांगितले.