कल्याण शहरातील कचरा उचलण्यात अपयशी ठेकेदाराला टर्मिनेट करण्याचे आदेश 

कल्याण शहरातील कचरा उचलण्यात अपयशी ठेकेदाराला टर्मिनेट करण्याचे आदेश 

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याणमधील  कचरा उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाने चार प्रभागात ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. परंतु या ठेकेदाराकडून समाधानकारकपाने कचरा उचलला जात नसल्याची ओरड होत आहे. याचे पडसाद आजच्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. ठेकेदाराकडून कचऱ्याचे वर्गीकरण देखील केले जात नसल्याने, तसेच कचराकुंड्या उचलण्या खेरीज कोणतेही काम होत नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर ठेकेदारावर दंडात्मक कारवाई होऊनही त्याच्या कामात सुधारणा होत नसल्याने अंतिम नोटीस देत सदर ठेकेदाराला टर्मिनेट करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती दिपेश म्हात्रे यांनी दिले.

कल्याण डोंबिवली शहरातील कचरा समस्येतून सुटका करण्यासाठी पालिका प्रशासनाने चार प्रभागात ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मात्र या ठेकेदाराकडून सदरचे काम समाधानकारकपणे होत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे या ठेकेदाराला बंधनकारक करण्यात आले असले तरी रस्त्याच्या कडेला असलेल्या कचराकुंड्या उचलण्या खेरीज कोणतेही काम होत नसल्यामुळे या ठेकेदाराच्या कामाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. मागील दोन महिन्यापासून दंडात्मक कारवाई केल्यानंतरही ठेकेदाराच्या कामात सुधारणा होत नसल्यामुळे अंतिम नोटीस देत या ठेकेदाराला टर्मिनेट करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी सभेत दिले आहेत. यामुळे यानंतर तरी ठेकेदार कामात सुधारणा करणार की काम बंद करणार हे लवकरच स्पष्ट होईल.

कल्याण डोंबिवली शहराची कचरा समस्येतून सुटका करण्यासाठी पालिका प्रशासनाने चार प्रभागात ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मात्र या ठेकेदाराला हे काम पेलेनासे झाले असून शहरातील कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी पहिल्या दिवसापासून होऊ लागल्या आहेत. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे या ठेकेदाराला बंधनकारक करण्यात आले असले तरी रस्त्याच्या कडेला असलेल्या कचराकुंड्या उचलण्या खेरीज कोणतेही काम होत नसल्यामुळे या ठेकेदाराच्या कामाबाबत नाराजी व्यक्त होत असून मागील दोन महिन्यापासून दंडात्मक कारवाई केल्यानंतरही ठेकेदाराच्या कामात सुधारणा होत नसल्यामुळे अंतिम नोटीस देत या ठेकेदाराला टर्मिनेट करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी दिले आहेत. यामुळे यानंतर तरी ठेकेदार कामात सुधारणा करणार की काम बंद करणार हे लवकरच स्पष्ट होईल.

महापालिका क्षेत्रातील कचरा उचलण्यात महापालिकेकडील कर्मचारी अपुरे पडत असल्याचे कारण पुढे करीत महापालिका क्षेत्रातील  ५९ प्रभागातील कचरा उचलण्यासाठी आर बी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती.  प्रत्यक्षात या ठेकेदाराकडून आखून दिलेल्या निकषांनुसार कचरा उचलला जात नसल्याने परिणामी त्या-त्या भागात कचऱ्याचे ढीग साचत असल्याने ठेकेदाराला मे आणि जून या दोन्ही महिन्यात दंड ठोठावण्यात आला होता. तरीही ठेकेदाराच्या कामात कोणतीही सुधारणा झाले नसल्याचे समोर आले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात देखील शहरातील कचऱ्याची परिस्थिती सुधारत नसल्याने आजच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्य आक्रमक झाले. कामचुकार ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. जयवंत भोईर, नितीन पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. 

सदर ठेकेदाराकडे असलेल्या गाड्यावर जीपीएस सिस्टीम लावलेली नाही. प्रत्येक घरातून ओला आणि सुका कचरा वेगळा करून या कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही कामे समाधानकारक होत नसल्याच्या तक्रारी सभेत करण्यात आल्या. अशीच परिस्थिती सुरु राहिल्यास कचरा समस्या सुटण्यापेक्षा त्यात आणखीन वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. सभेच्या भावना लक्षात घेत सभापती म्हात्रे यांनी यामुळेच या ठेकेदाराला नोटीस देत टर्मिनेट करण्याचे आदेश दिले.