कल्याण येथे रक्तदान आणि प्लाझ्मा दान नोंदणी शिबिराचे आयोजन 

कल्याण येथे रक्तदान आणि प्लाझ्मा दान नोंदणी शिबिराचे आयोजन 

कल्याण (प्रतिनिधी) : कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेला मदत करण्याची भूमिका घेत स्थापन झालेल्या कोरोना समुपदेशन समितीने ( नियोजित) रविवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कल्याण पश्चिमेतील स्वामी नारायण हाॅल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर, शंकरराव चौक, कल्याण ( पश्चिम ) येथे  रक्तदान शिबिर  व प्लाझ्मा दान नोंदणी शिबिर आयोजित केले आहे.

कोरोना समुपदेशन समितीने कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने प्लाझ्मा मिळावा यासाठी या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची नोंदणी करतानाच त्यांचा एक व्हाटसअप समूह (Group)  तयार करण्यात केला आहे. जी मंडळी रक्तदान करण्यास आणि  कोरोनातून  बरे झालेले जे  रूग्ण कोरोना रूग्णांना जीवदान मिळावे म्हणून  प्लाझ्मा देण्यासाठी  इच्छूक आहेत  अशांसाठीच हा ग्रुप आला असल्याचे समितीचे अध्यक्ष अनिल काकडे यांनी स्पष्ट केले आहे. सदर ग्रुपची लिंक (https://chat.whatsapp.com/HuCBanrd18P5vlsBQGyF2v) आपल्या संपर्कातील संबंधितांना पाठवून सामाजिक बांधिलकी जपावी. मात्र इतरांनी हया ग्रुपमध्ये जॉईन  होवू नये, असेही काकडे यांनी सूचित केले आहे.