ठाणे महापालिकेला ऑक्स‍िजन कॉन्स्ट्रेटर भेट

ठाणे महापालिकेला ऑक्स‍िजन कॉन्स्ट्रेटर भेट

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयाकरिता रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने ५ ऑक्स‍िजन कॉन्स्ट्रेटर भेट म्हणून देण्यात आले. बुधवारी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे महेश गुप्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे ऑक्स‍िजन कॉन्स्ट्रेटर सुपुर्द केले.

ग्लोबल ग्रेन्ट यांच्यावतीने १० लीटरचे पाच ऑक्स‍िजन कॉन्स्ट्रेटर महापौर कार्यालयात देण्यात आले. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मारूती खोडके, अश्व‍िनी वाघमळे व रोटरी क्लब नॉर्थ एण्‌ड ठाणेचे रणधीर राठोड, राजेश परांजपे आदी उपस्थित होते.   

कोविड काळात देखील रोटरी क्ल्ब ऑफ ठाणे नॉर्थ यांनी महापालिकेस सहकार्य करण्याच्या दृष्टीने पीपीई किटचे वाटप केले होते. सद्यस्थ‍ितीत महापालिका क्षेत्रात कोविड रुग्णसंख्या कमी आहे. परंतु या ऑक्स‍िजन कॉन्स्ट्रेटरचा उपयोग हा ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात निश्चितच होईल, असा विश्वास यावेळी महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला.