कल्याणच्या तहसीलदारांसह शिपायाला लाच घेताना अटक

कल्याणच्या तहसीलदारांसह शिपायाला लाच घेताना अटक

कल्याण (प्रतिनिधी) : बांधकाम कंपनीच्या मौजै वरप येथील जमिनीबाबतचे हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्याप्रकरणी एकुण १ लाख २० हजार रु. लाच प्रकरणी तक्रारदाराच्या तक्रारीवरून कल्याणचे तहसीलदार दिपक आडके, शिपाई बाबु उर्फ मनोहर हरड या दोघांना सोमवारी दुपारी ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने कल्याण तहसीलदार कार्यालयातील दालनात रंगेहाथ पकडले. या घटनेने लाचखोरीचे ग्रहण कल्याण तहसीलदार कार्यालया लागल्याचे समोर आले.

एका बांधकाम कंपनीच्या वरप येथील घेतलेल्या जमिनीबाबतचे हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी २६आँगस्ट रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान तक्रारदाराकडे १ लाख २० हजार रू. लाचेची मागणी तहसीलदार आकडे यांनी केली होती. त्या लाचेतील १ लाख रु. स्वतः साठी तसेच कार्यालीन शिपाई मनोहर हरड याने स्टाफकरिता २० हजार रू. लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराच्या तक्रारी नुसार पडताळणी करीत सोमवारी दुपारी ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, सहकारी पोना प्रशांत घोलप,  मपोना जयश्री पवार,  पोशि विनोद जाधव, पोशि पद्माकर पारधी, पोहवा महाले यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक निलिमा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तहसीलदार कार्यालयात सापळा लावित कल्याण तहसीलदार दिपक आडके, शिपाई मनोहर हरड यांना दालनात लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने तहसीलदार कार्यालयातील दलाल, लाचखोरीच्या ग्रहणांच्या चर्चा सर्वसामान्यापासुन सर्वच स्तरात रंगल्या होत्या.