मराठा सेवा संघाचा पोवाडा

मराठा सेवा संघाचा पोवाडा

मराठा सेवा संघाला ३० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील मराठा सेवा संघाच्या विचारधारेचे कट्टर पुरस्कर्ते असलेले लेखक, कवी शिवप्रदीपाचार्य डॉ. दिलीप धानके यांनी मराठा सेवा संघाच्या आजपर्यंतच्या वाटचालीवर आधारित एक अप्रतिम पोवाडा लिहिला आहे. हा पोवाडा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडसह इतर सर्व कक्षांमध्ये लोकप्रिय ठरत असून तो ‘कोंकण वृत्तांत’च्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

१ सप्टेंबर एकोनिसशे नव्वद साली
एकत्र झाल्या मराठा तलवार ढाली
पेटल्या विद्रोही क्रांतीच्या मशाली 
पुरोगामी विचारांची शिव प्रणाली
पुरुषोत्तम खेडेकरानी हो हाक दिली..जी..जी.जी.

जागा झाला कुणबी मराठा 
सोडला सरंजामशाही ताठा
शिवमर्दानो चला पेटून उठा 
अंधार जाळू शोधू नव्या वाटा
जातीच्या भींती पाडू भेदू गटातटा हो..हो..हो.

समतेची राज्य घटना घेऊनी
मराठा सेवा संघ स्थापूनी
मराठानायक पुरुषोत्तमानी
जिजाऊ शिवबाला वंदुनी
गर्जु लागली खेडेकर वाणी.जी..जी.जी.

कुणबी मराठा देशमुख पाटील 
सर्वांची जोडली एकच नाळ
शिवबा आपला एकच भूपाल
त्याला वंदुनी गडया पुढे चाल
मराठा सेवा संघाचे क्रांती वादळ हो..हो.हो...

एक मराठा लाख मराठा झाला गजर
गावोगावी भरु लागले मराठा दरबार 
तळपली आमच्या लेखणीची तलवार 
व्याख्यानातून फुले शाहुंचा विचार 
बुलंद नेता आमचा साहेब खेडेकर जी..जी..जी..

जिजाऊ ब्रिगेडचे भगिणी दल
संभाजी ब्रिगेड आग्या मोहळ
मनुवादयांचा तो कर्दनकाळ
भटशाहीला ठोकली घोडयाची नाल
पुरंदरी विकृतांची झाली पळापळ हो..हो..हो..

उध्वस्त झाले भांडारकरी अड्डे
बुजविले बघा मनुवादाचे खड्डे 
शिवलेखणीतून फोडले नरडे
कपटी कृष्णाजी थया थया ओरडे
जाळली आम्ही जुनी कर्मकांडे जी..जी..जी.

आम्ही पुर्ण वाचला शिवराया
तसाच तो संविधान भीमराया
बुद्ध आणि शुद्ध तुकाराम पाया
आणि जिजाऊंची विचार छाया
घडली आमची सत्यशोधक काया......जी जी जी जी रं

मन मणगट मेंदू मणका 
सशक्त मराठयांचा दणका
जागृत केले आई बालका
सोधल्या भटशाहीच्या चुका
आता शिवधर्माच्याच हाका हो...हो..हो..

सण आमचा जिजाऊ जंयती
एकोणीस फेब्रुवारीची शिवजयंती 
विचारांची गुंफली नवी नाती
बहुजनांशी जोडली प्रिती
मराठा सेवा संघाची ही गती जी..जी.जी.जी रं

बहुजन गडयांनो जय जिजाऊ बोलू
भिमरायाचे तेच संविधान चालू 
जोतिबाचे गुलामगिरी पुस्तक खोलू
आज नव्या मनुस्मृतीला पुन्हा जाळू
शिवधर्माचेच विचार खेळ खेळू  हो..हो..हो..

मराठा सेवा संघ समतेचा रंग
मनुच्या चालीत होऊ नका दंग
जोतीबांचे अखंड तुकोबाचे अभंग
वाचूनी होऊ आता एकसंघ
एकच शिवध्वज जिंकूया जंग जी.. जी...जी...

तिस वर्षाची झाली क्रांती चळवळ 
शाहू नंतर ही पुरुषोत्तमाची तळमळ 
अखिल बहुजनांचे एक करण्या बळ
युगपुरुष खेडेकर साहेबांचे शिवसंबल
दिलीप धानके लिहीतो एक ओंजळ जी ..जी...जी..जी.जी रं
---

लेखन: शिवप्रदीपाचार्य डॉ. दिलीप धानके
पत्ता: जिजाऊ दर्शन, मु.पो.नांदगाव(सो), 
ता.शहापूर, जि.ठाणे.
मोबाईल: ९४२१६२२८५३