राष्ट्रवादीच्या कल्याण डोंबिवली निरीक्षकपदी प्रमोद हिंदुराव

राष्ट्रवादीच्या कल्याण डोंबिवली निरीक्षकपदी प्रमोद हिंदुराव

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निरीक्षकपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद हिंदुराव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुराव यांची निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याने महापालिकेतील पक्षाचे संख्याबळ वाढविण्याची त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी एका पत्राद्वारे हिंदुराव यांची नियुक्त केली आहे. निरीक्षक म्हणून हिंदुराव यांनी कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करावा.  प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन पक्ष संघटना बळकट करण्यासाठी नियोजन करावे व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.