रत्नागिरी जिल्ह्यातून पहिला IAS अधिकारी प्रथमेश राजेशिर्के

रत्नागिरी जिल्ह्यातून पहिला IAS अधिकारी प्रथमेश राजेशिर्के

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील मांडकी गावचे सुपुत्र प्रथमेश अरविंद राजेशिर्के यांनी २०२० च्या युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होत रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला आयएएस अधिकारी म्हणून निवड होण्याचा मान पटकावला आहे त्यांना २३६ रँक प्राप्त झाली आहे.

प्रथमेश अरविद राजेशिर्के  यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण एसव्हीजेसीटी डेरवण येथील इंग्रजी माध्यमिक शाळेत झाले, तर पुढील शिक्षण त्यांनी रत्नागिरी शासकीय आयटीआयमध्ये घेतले. शिक्षण सांगली येथील वालचंद महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दिल्ली येथे युपीएससी परीक्षेचा अभ्यास पूर्ण केले.

दहावीत असतानाच प्रथमेशने आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी  बाळगत आपले ध्येय गाठले. कै. अरविद राजेशिर्के व आई शर्मिला राजेशिर्के यांचे ते सुपुत्र असून त्याचे वडील माजी सैनिक होते. त्यांचे वर्षभरापूर्वीच कोव्हिडंमुळे निधन झाले होते. मांडकी गावचे माजी उपसरपंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश राजेशिर्के यांचा प्रथमेश हा भाऊ आहे. प्रथमेशने खूप परिश्रम  करून मिळवलेल्या यशाबदल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशापासून प्रेरणा घेऊन कोकणातील मुलांनी भविष्यातील शासकीय अधिकारी होण्यातील कोकणातील टक्का वाढावावा अशी इच्छा प्रथमेशने व्यक्त केली आहे. 'कोंकण वृत्तांत' (न्यूज पोर्टल) परिवाराच्या वतीने प्रथमेश राजेशिर्के यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.