राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या सदस्यपदी प्रवीण मुसळे

राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या सदस्यपदी प्रवीण मुसळे

कल्याण (प्रतिनिधी) :
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या सदस्यपदी कल्याण येथील युवा कार्यकर्ते प्रवीण मुसळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेलच्या प्रदेश अध्यक्षा खा. वंदना चव्हाण यांच्या हस्ते मुसळे यांना नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले.

राष्ट्रवादीच्या अर्बन सेलची एक बैठक नुकतीच मुबई येथील पक्षाच्या कार्यालयात पार पडली. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, अर्बन सेलच्या प्रदेश अध्यक्ष खा. वंदनाताई चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी मुसळे यांच्यासह सेलच्या काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. अर्बन सेलचे काम करतानाच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळात पोहचविण्याची जबाबदारी आपण पार पाडू अशी प्रतिक्रिया नियुक्तीनंतर मुसळे यांनी व्यक्त केली आहे.