बंडखोरांना जनता थारा देणार नाही- मुख्यमंत्री 

बंडखोरांना जनता थारा देणार नाही- मुख्यमंत्री 

कल्याण (प्रतिनिधी) : 
कल्याणमधील बंडखोरांना सुज्ञ जनता थारा देणार नाही. काहीही झाले तरी कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निवडणून येतील, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पूर्वेतील भाजप-शिवसेना-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्धाटन करताना व्यक्त केला.

गायकवाड यांच्या तिसगाव नाका येथील मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रथम उद्घाटन पार पडले. त्यानंतर फडणवीस यांनी छोटेखानी भाषण झाले. यावेळी मंचावर शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब रोकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, सरचिटणीस नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह अनेक नगरसेवक-पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना गणपत गायकवाड यांनी सांगितले की, माझ्या विजयासाठी महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. यावेळी प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.