एक लाखाची लाच घेताना पीडब्ल्यूडीचा अभियंत्याला रंगेहात अटक

एक लाखाची लाच घेताना पीडब्ल्यूडीचा अभियंत्याला रंगेहात अटक

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंत्याला एक लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. अविनाश पांडुरंग भानुशाली (वय-५७ वर्ष) असे लाचप्रकरणी अटक केलेल्या शाखा अभियंताचे नाव आहे.

सदर प्रकरणातील तक्रारदाराच्या मालकीच्या जमीनीवरील बांधकाम हे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे भुसंपादनात जात आहे. या बांधकामांचे मुल्यमापन करुन अहवाल देण्यासाठी आरोपी अविनाश भानुशाली यांनी ९ सप्टेंबर रोजी कागदपत्रे पडताळणी दरम्यान यापूर्वी ४ लाख स्विकारल्याचे मान्य करुन आणखी १ लाख रकमेच्या लाचेची मागणी केली.

१ लाख दिले तरच अहवाल मिळणार असे सांगितले. यामुळे तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन आज  दुपारच्या सुमारास ठाणे लाचलुचपत पथकाने सापळा रचून  कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात १ लाख रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे.