कल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’

कल्याण शहराचा गौरव ‘राजा हॉटेल’

कल्याण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले राजा हॉटेल कल्याण शहराची शान आहे. शाकाहारी-मांसाहारी असे दोन्ही प्रकारच्या खाद्यपदार्थाने परिपूर्ण रेस्टॉरंट आणि बार असलेल्या हॉटेलचे नुकतेच नुतनीकरण करण्यात आले आहे. बाहेर गावावरून कल्याण शहरात येणारे पर्यटक, व्यापारी, उद्योगपती, खाजगी कंपन्यांचे अधिकारी, सरकारी-निमसरकारी अधिकारी आदींची राहण्यासाठी प्रथम पसंती ही राजा हॉटेलला असते. कल्याण आणि परिसरात येणारे नाटक, चित्रपट, साहित्यिक क्षेत्रातील दिग्गज कलाकार देखील राजा हॉटेलला राहण्यासाठी पहिली पसंती देतात. विविध सरकारी-निमसरकारी विभागांचे उच्च पदस्थ अधिकारी व राजकीय नेत्यांचे निवासाचे हे आवडीचे हॉटेल आहे.

तळमजला अधिक चार मजली इमारत असलेल्या राजा हॉटेलमध्ये थ्री स्टार दर्जाच्या हॉटेलला लाजवतील अशा सुविधा आणि सेवा उपलब्ध आहेत. हॉटेलचे मालक देवाशेठ स्वत: ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर लक्ष ठेवून असतात. २० ऑक्टोबर १९९६ रोजी सुरु झालेल्या या हॉटेलला २० नोव्हेंबर २०२० रोजी २५ वर्ष होत असून ते रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. नुकतेच हॉटेलचे नुतनीकरण व रंगरंगोटी केल्याने आता आणखी आकर्षक रुपात राजा हॉटेल ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहे. 

मूळ कल्याणकर असलेल्या देवा शेठ यांचे वडील घनश्याम तेली हे शहरात कोळशाचा, पाणीपुरी-भेळपुरीचा व्यवसाय करीत. त्यावेळी ते कल्याण कॉंग्रेसचे नेते होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देवाशेठ यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आणि गेली २५ वर्ष सचोटीने व्यवसाय करीत ग्राहकांना समाधानकारक सेवा देत राजा हॉटेलचा नावलौकिक वाढवीत असतानाच कल्याण शहराचा गौरव देखील वाढविला.

राजा हॉटेलच्या तळमजल्यावर व टेरेसवर अनेक व्यावसायिक संस्था, सामाजिक शैक्षणिक संस्था-ट्रस्ट, पत्रकार संस्थांचे विविध कार्यक्रम पार पडतात. राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते कार्यक्रमांसाठी राजा हॉटेललाच आयोजित करण्यास पसंती देतात. शहरात येणारे पर्यटक, व्यापारी-उद्योगपती, उच्च पदस्थ अधिकारी, राजकीय नेते आदींना राहण्यायोग्य प्रथम पसंतीचे हॉटेल म्हणून गेल्या २५ वर्षांपासून राजा हॉटेल ओळखले जाते. विविध सरकारी-निमसरकारी विभागांचे उच्च पदस्थ अधिकारी व राजकीय नेत्यांचे निवासाचे हे आवडीचे हॉटेल आहे. कल्याण आणि परिसरात येणारे नाटक, चित्रपट, साहित्यिक क्षेत्रातील दिग्गज कलाकार देखील राजा हॉटेललाच राहण्यासाठी पहिली पसंती देतात. 

राजा हॉटेलमध्ये इंडियन, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदुरी, जैन डिशेस, काँन्टीनेंटल, चायनीज, थाई अशा सर्वच प्रकारच्या व्हेज-नॉनव्हेज डिशेसमधील चविष्ट-रुचकर अन्नपदार्थ मिळत असल्याने ग्राहकांना समाधान मिळते. हॉटेलची खासियत म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत संपूर्ण कुटुंब येऊ शकत असल्याने फॅमिली रेस्टॉरंट म्हणूनही या हॉटेलची ओळख निर्माण झाली आहे. येथील अन्नपदार्थ क्वॉलिटी आणि क्वाँटीटीच्या बाबतीत इतर हॉटेलच्या तुलनेत सरस असून ते किफायतशीर दरामध्ये उपलब्ध आहे. येथील व्यवस्थापन आणि स्टाफ शिस्तबद्धपणे ग्राहकांना सेवा देतो, त्यांच्याकडे आपुलकीने लक्ष पुरवतो. राजा हॉटेलमध्ये नीटनेटकेपणा, टापटीपपणा आणि विशेषतः स्वच्छता काटेकोरपणे राखली जाते. त्यामुळेच येथे येणारे ग्राहक हॉटेलशी कायमचे जोडले जातात. येथे मिळणारी सुविधा आणि सेवा सर्वोत्तम असल्यानेच राजा हॉटेलने कल्याण शहराच्या जीवनात गौरवाचे स्थान प्राप्त केले आहे.

--

    प्रविण आंब्रे
मोब.नं.: ९२७०३४९१११