राज्यपालांच्या हस्ते रामचंद्र देसले सन्मानित

राज्यपालांच्या हस्ते रामचंद्र देसले सन्मानित

भिंवडी  (रोहीदास पाटील) : भिंवडी तालूक्यातील भोकरी येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र शांताराम देसले यांनी श्री समर्थ कृपा इलेक्टीकल कंपनीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांप्रदायिक, कृषी, उद्योग क्षेत्रात सुशिक्षित बेरोजगार तरूणांना रोजगार  मिळवून दिला आहे. त्यांनी  केलेल्या समाज कार्याची दखल घेत ओरिसा राज्यातील महात्मागांधी ग्लोबल पीस फाऊडेशन इन्स्टिट्यूट आँफ भूवनेश्वर या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जाहीर केलेल्या  महात्मा गांधी गौरव पूरस्कार, मानद डाँक्टरेट पदवी व कोरोना योद्धा  पूरस्काराने राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

कोरोना महामारीमध्ये गरजू नागरिकांना, आरोग्य यंत्रणेला मदत करणारे रामचंद्र देसले या़चे कार्य मोलाचे आहे. आपण समाजाचे देणे लागतो ही उदात्त भावनेने ते आपले काम करत आहे. कुणबी समाजाच्या उन्नतीसाठी ते नेहमी अग्रेसर असतात. भोकरी गावाचे नाव नावलौकीक करणारे रामचंद्र शांताराम देसले (राम पाटील) यांना राज्यपालाच्या हस्ते पूरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी आरएसपीचे महासमादेशक डॉ. अरविंद देशमूख,  आरसीएफचे कमाडंर व महाराष्ट्र राज्याचे ब्रँड आँबेसिडर डॉ. मणीलाल शिंपी याच्या उपस्थित सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार शांताराम मोरे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, देवा ग्रूप फाऊनडेशन महाराष्ट्र राज्याचे  सचिव डाँ तानाजी मोरे, कुणबी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय पाटील, भिंवडी तालूका कुणबी समाज मंडलाचे विष्णु चंदे, अँड. यूवराज पाटील, रविंद्र पाटील आदींनी देसले यांचे या सन्मानाबद्दल अभिनंदन केले आहे.